राहुरी वेब प्रतिनिधी,१६ (शरद पाचारणे) –
शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खते उपलब्ध करून देत शेतकऱ्यांची फसवणूक अथवा अडवणूक होणार नाही याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशा सूचना आ.शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्या.
राहुरी येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा बैठक आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे, डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे, शामराव निमसे, माजी जिप सदस्य विक्रम तांबे, दिलीप जठार, अमोल भनगडे, धनजंय आढाव, युवराज गाडे, उत्तमराव म्हसे, रवींद्र म्हसे, अनिल आढाव, सर्जेराव घाडगे, आण्णा बाचकर आदी उपस्थित होते.
आ.कर्डिले यावेळी बोलताना म्हणाले की, जलजीवन मिशन योजनेची सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार असून जलजीवन पाणी योजना, वीज रोहित्र हे प्रश्न शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे विषय आहेत. शासकीय जागेवर सौर उर्जेचे प्रकल्प राबविण्याचे शासनाचे धोरण आहे त्यासाठी पाठपुरावा करू. ज्या गावांची पाण्याच्या टँकरची मागणी असेल त्यांचे त्वरित प्रस्ताव तयार करावेत. शेतकऱ्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी समन्वय ठेवावा अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी नुसार संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा करून कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले.
यावेळी भिमराज हारदे, शिवाजी सागर, सुरसिंग पवार, नंदकुमार डोळस, नारायण झावरे, योगेश काळे, प्रभाकर हरिश्चंद्रे, उत्तमराव आढाव, गोरक्षनाथ तारडे, रावसाहेब शिंदे, गणेश नेहे, भैय्यासाहेब शेळके, उमेश शेळके आदींसह कार्यकर्ते, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन नायब तहसिलदार संध्या दळवी यांनी केले तर गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी आभार मानले.