राहुरी वेब प्रतिनिधी ,१६(शरद पाचारणे )- डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ
निवडणूकीत यावर्षी सभासदांना वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातुन पर्याय निर्माण झाले आहेत. तालुक्यातील अन्य नेतृत्वाला काम करण्याची संधी मिळावी म्हणून तसेच ऊस उत्पादक सभासद व कामगगार यांच्या हितासाठी भाजप व महायुतीच्या (परिवर्तन पॅनल) सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेतले असल्याची माहीती डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव पा ढोकणे यांनी दिली.
यंदाच्या पंचवार्षिक निवडणूकीत सभासदांनी मोठ्या संख्यने उमदेवारी अर्ज दाखल केले. सर्व उमेदवार अर्ज पाहाता सभासदांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यांनाही संधी मिळावी ही भूमिका घेत परिवर्तन पॅनलने निवडणूकीतील सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेतले आहेत. संचालक मंडळाच्या निवडणूकीत सभासद ज्या उमेदवारांना समर्थन देवून विजयी करतील त्यांना सर्व सहकार्य करण्याची भूमिका ही परिवर्तन मंडळाची असेल.
सभासदांच्या हितासाठी कारखाना सुरळीतपणे सुरु व्हावा यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य आ.शिवाजीराव कर्डीले व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातुन देण्याची तयारी कायम ठेवून परिवर्तन पॅनलने निवडणूकीतून माघार घेतली असल्याचे नामदेव पा ढोकणे यांनी म्हटले आहे.
राहुरी तनपुरे सहकारी साखर कारखाना बिनविरोध होण्यासाठी परिवर्तन मंडळाच्या सर्व उमेदवार व माजी संचालक मंडळाचे अर्ज हे माघारी घेवून कारखाना बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण विरोधाकांनी राजकारण करुन बंद पडलेल्या साखर कारखानांची निवडणुक लादली आहेत. यासाठी तिन पॅनल तयार झाले आहेत,
राहुरी तालुक्यातील ऊस सभासद यांना समोर पर्याय निर्माण झालेले आहेत. त्यामुळे भाजपा व महायुतीतील परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांनी वरिष्ठ नेत्याचा आदेश पाळत निवडणुकीतुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यानी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यांचेही आभार ढोकणे यांनी मानुन विजयी होणा-या पॅनला सहकार्य केले जाईल असेही सांगितले आहे.