राहुरी वेब प्रतिनिधी ,१८ ( शरद पाचारणे ) –
शैक्षणिक वर्ष 24 – 25 या वर्षाचे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएससी बोर्ड चे दहावी व बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली इयत्ता बारावी मध्ये भक्ती प्रदीप विटनोर या विद्यार्थिनीने 78.20% गुण मिळत प्रथम क्रमांकाचा मान मिळवला तसेच लवीना टायटस 75.90% द्वितीय क्रमांक तर शुभम पोंदे याने 75.80% तृतीय क्रमांक तर दुर्गा कोबरणे हिने 73.90% चतुर्थ क्रमांक मिळवला व तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये सोहम राहुल ठोंबरे या विद्यार्थ्याने 89.40% इतके गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला व भूषण जाधव यांनी 88.10% प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर कुमार संदीप कोबरणे याने 83.80% गुण मिळत तृतीय क्रमांक प्राप्त केला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ वाणी सर सेक्रेटरी डॉ दत्तात्रय वाणी सर व शाळेच्या प्राचार्या सोनिया जोसेफ मॅडम उपप्राचार्य कडू सर सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेने यावर्षी संपूर्ण शाळा ही स्मार्ट क्लास केले असून रोबोटिक्स लॅब सारखे अत्याधुनिक साधनसामग्रीच्या साह्याने मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे शाळेमध्ये सर्व प्रकारचे क्रीडा प्रकार उच्च शिक्षक वृंद व अत्याधुनिक साधनांचा वापर करून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा सतत प्रयत्न करत आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्व परिसरातून कौतिक होत आहे.