राहुरी वेब प्रतिनिधी,१४ ( शरद पाचारणे )-
राहुरीत “यूथ फॉर जॉब, अनामप्रेम व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी तसेच प्रहार दिव्यांग संघटना उत्तर अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने” चला नोकरी मिळवून देऊ या दिव्यांगाना” चला व्यावसायिक बनवूया दिव्यांगांना “या उपक्रमांतर्गत “दिव्यांग बांधवांसाठी भव्य नोकरी मेळावा व व्यवसाय कर्ज मार्गदर्शन मेळावा” आयोजित करण्यात आला.यामध्ये दिव्यांग बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 22 मुलांची निवड प्रशिक्षण व व्यवसाय कर्ज साठी झाले आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना स्थानिक कंपन्यांमध्ये नोकरी किंवा कर्ज मिळून देणार आहे. निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन वरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार दिव्यांग संघटनेचे सल्लागार सलीमभाई शेख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर घाडगे, यांनी केले. पोलीस निरीक्षक लबडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. युथ फॉर जॉब संस्थेचे समन्वयक श्री. विजय सातदिवे, यांनी नोकरी व प्रशिक्षण संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी अनामप्रेम संस्थेचे एक्झिक्यूटिव्ह तुळशीराम जाधव सर यांनी व्यवसाय कर्ज विषयी मार्गदर्शन केले प्रशांत गायकवाड सर व यांनी अनामप्रेम प्रवीण नवले सर संस्थेचे उपक्रम संदर्भात माहिती दिली यावेळी तालुकाध्यक्ष योगेश लबडे, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी, शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले नानासाहेब खपके संतोष धुमाळ पाराजी भोसले ,वैष्णवी मॅडम, प्रविण नवले सर, उपस्थितांचे आभार प्रहार दिव्यांग संघटनेचे संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी यांनी मानले .