राहुरी वेब प्रतिनिधी,१४ (शरद पाचारणे )-
शिवांकुर विद्यालयाचा परंपरेप्रमाणे इ १० वी चा मार्च २०२५ चा निकाल १००% लागला. विद्यालयातील प्रथम ३ विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
१) कु. सायली सतीश काळे 463 /92.60%
२) चि. चैतन्य संतोष ढोकणे 443/88.60%
३) कु. मयुरी रंभाजी ढोकणे 437/87.40%
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि पालक यांचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके, विश्वस्त मंगल पवार, डॉ गौरी पवार, ज्योती शेळके, शिल्पा इंगळे व संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धूमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, रोहिणी भाकरे, सुजाता तारडे, सुनिता ढोकणे, रूपाली रासने, अंजली धोंडे, दुर्गा बारवेकर, साक्षी शिंदे, रोहिणी हापसे, शिपाई शारदा तमन,र परिवहन विभाग प्रमुख अशोक गाडे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचे नर्सरी, एलकेजी, यूकेजी, १ ली ते १० वी चे प्रवेश सुरू झाले आहेत तरी मर्यादित विद्यार्थी संख्या असल्याने पालकांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.