राहुरी वेब प्रतिनिधी, १३ ( शरद पाचारणे )-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून राजेंद्रकुमार पाटील यांनी नुकताच पदभार स्विकारल्यानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आज त्यांचा सत्कार त्यांचे कार्यालयात जाऊन केला यावेळी प्रसाद तनपुरे यांनी शुभेच्छा देऊन विविध विषयावर चर्चा केली.कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील हे कृषी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वीही त्यांनी कुलसचिव म्हणून विद्यापीठात अतिशय चांगले काम केले आहे. त्यानंतर त्यांची अहिल्यानगरचे अप्पर निवासी जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यात काम पहिल्यानंतर शासनाने त्यांचेवर पुन्हा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे.माजी खासदार व विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून अनेक वर्ष काम केलेले माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कृषी विद्यापीठ येथे जाऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे समवेत प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे पत्रकार संजय कुलकर्णी उपस्थित होते.प्रेरणा ग्रुपच्या वतीने सुरेश वाबळे यांनीही कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांचा सत्कार केला.प्रसाद तनपुरे व राजेंद्रकुमार पाटील यांनी विद्यापीठाच्या विविध विषयावर चर्चा करताना विशेषतः टीश्यू कल्चर, बायो टेकनॉलॉजि या तनपुरे यांच्या काळात सुरु झालेल्या प्रकल्पाविषयीं माहिती घेऊन त्यांचा गेल्या २० वर्षात त्याचा शेतकऱ्यांना किती लाभ मिळाला याची माहिती घेतली. तसेच विद्यापीठातील किती जागा रिक्त आहेत याची विचारणा केली असता आज अखेर विद्यापीठाचे कार्यक्षेत्रात जवळपास ५७ टक्के जागा रिक्त असून शासनाने अनेक वर्षांपासून नोकरी भरती न केल्याने आहे त्या अधिकारी कर्मचारी यांचेकडे अतिरिक्तभार सोपवला जात आहे. अनेकवर्षं नोकर भरती न झाल्याबद्दल प्रसाद तनपुरे यांनी चिंता व्यक्त केली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्या उद्देशाने कृषी विद्यापीठासाठी जमिनी दिल्या तो उद्देश फोल ठरल्याचे तनपुरे म्हणाले. देशाचे कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी कृषी विद्यापीठासाठी सीमेन्स केंद्र दिले त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. बायो टेकनॉलॉजि या प्रकल्पसाठी विधान सभेत आमदार असताना तत्कालीन अर्थ मंत्री जयंत पाटील यांचेकडून मंजुरी देऊन त्यासाठीही भरीव निधीचा धनादेश जयंत पाटील यांनी स्वतः कृषी विद्यापीठात आणून दिल्याची आठवण करून दिली.सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत त्या दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा होऊन रिक्त जागाच्या भरतीसाठी शासन दरबारी कुलसचिव यानात्याने आपण प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू यांचेकडे अतिरिक्त दुसऱ्या कृषी विद्यापीठाचा कार्यभार असल्याने त्यांचेशी भ्रमण ध्वनीवरून चर्चा केली. नवीन कुलगुरूची भरती प्रक्रिया अद्याप प्रलंबीत असून नवीन कुलगुरू लवकरात लवकर नेमला जावा अशीही मागणी यावेळी केली.यावेळी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, उद्यान विभागाचे अधिकारी सहाय्यक दत्ता कदम उपस्थित होते.