छंद वर्गाचे गावोगावी अनुकरण झाले पाहिजे – महंत उद्धव महाराज मंडलिक

राहुरी वेब प्रतिनिधी १३ ( शरद पाचारणे )-
मुलींच्या अंगी असलेले सुप्त गुणांना कलाना वाव देण्यासाठी शहरातील सौ.भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालयात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या संकल्पनेतून शालेय मुलींसाठी सुरू असलेला छंदवर्ग हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा छंद वर्गाचे गावोगावी अनुकरण झाले पाहिजे, असे नेवासा येथील महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.
राहुरी येथे भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालयात २ ते १९ मे दरम्यान शालेय मुलींना विविध कलांचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरू असलेल्या छंद वर्गाला भेटीप्रसंगी महंत उद्धव महाराज मंडलिक बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे, प्राचार्य शुभांगी उंडे, पर्यवेक्षक ज्योती दिघे, प्रदीप तनपुरे, रवींद्र आढाव, संतोष निकम, प्रशिक्षक प्रशांत सूर्यवंशी, मंगल आढाव, कविता जेजुरकर, स्वाती कोरडे, हौशीनाथ बोर्डे उपस्थित होते.
महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी विद्यार्थिनींना केलेल्या मार्गदर्शनात म्हणाले की, पूर्वी सुटीच्या दिवसात सर्व सामान्य व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींना घरचे शेताचे कामे करावी लागत पण आता त्यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेने जो उपक्रम हाती घेतला निश्चित चांगला उपक्रम असून त्याचा त्यांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे.ते जीवनातील सुख दुःख, ताणतणाव दूर करण्यासाठी माणसाला छंदच उपयोगी पडतो. अंगभूत कलागुणांचा छंद सुखी जीवनाचा मार्ग दाखवितो.
प्रसाद तनपुरे, माजी खासदार आपल्या भाषणात म्हणाले की,छंद वर्गामुळे मुली मोबाईल, टीव्हीपासून दूर राहिल्या. चित्रकला, रांगोळी, मेहंदी, गायन, वादन अशा कलागुणांबरोबर स्वयंपाक, ताटात अन्नपदार्थ कसे वाढायचे याचे शिक्षण मिळत आहे. या छंद वर्गात भाग घेतलेल्या मुली भाग्यवान आहेत. आजकाल स्वतःच्या मुलांकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नाही. येथे माजी खासदार तनपुरे यांच्या प्रेरणेने तज्ज्ञ शिक्षक वृंदाने उन्हाळ्याच्या सुटीत मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव, प्रशिक्षण, प्रोत्साहन दिले आहे.१९६६ पासून भारत देश प्राचीन काळापासून विश्वगुरू आहे. नालंदा विद्यापीठात देश-विदेशांतील विद्यार्थी शिक्षण घेत होते. नऊ मजली ग्रंथालय होते. एवढा प्राचीन वारसा देशाला आहे. विज्ञानाला अध्यात्माची जोड असेल, तर प्रगती होते. समाज प्रबोधनाचा नैतिक अधिकार महंत उद्धव महाराज यांच्या सारख्यांना आहे. राजकीय पुढाऱ्यांना नाही. भावी पिढीवर चांगले संस्कार व्हावे.
यावेळी प्रास्ताविक प्रशांत सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन कविता जेजुरकर यांनी केले व आभार शाळेच्या प्राचार्या शुभांगी उंडे यांनी मानले.
[ ] चौकट (उद्याच्या भारताची आदर्श पिढी घडविताना जातीभेद पंक्तीभेद, धर्मीय भेद न करता आपण सर्व भारतीय आहोत हा विचार ठेऊन देशा समोर कितीही संकटे आली त्याला आपण जे पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात चोख उत्तर दिले ते आपल्या जवळ भारी शस्त्रे, अन्वस्त्र होते म्हणून नाही तर देश वाशियांनी जाती धर्माचा एकोपा ठेऊन आम्ही सर्व भारतीय म्हणून एक आहोत हे दाखवून दिले असे महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *