ह.भ.प.अमोल महाराज पिसे यांना गरुड फाऊंडेशनचा राज्यस्तरीय “धर्मभुषण” पुरस्कार जाहीर

राहूरी वेब प्रतिनिधी,१३ (शरद पाचारणे )- 

गरुड फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२५ यावर्षी आध्यात्मिक धार्मिक व वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कार्य करणारे राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील सुप्रसिद्ध युवा किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. अमोल महाराज पिसे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

गरुड फाउंडेशनचे कार्याध्यक्ष रमेश खेमनर यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या काही वर्षात आपण करत असलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन, आपल्या कार्याचा गौरव व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आपणास राज्यस्तरीय “धर्मभूषण” पुरस्कार जाहीर करीत आहोत. ह.भ.प. अमोल महाराज पिसे हे आध्यात्मिक वारकरी क्षेत्रात मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध सामाजिक उपक्रमांना मार्गदर्शन करत आहेत.

सोशल मेडीयाच्या माध्यामातून तरुणांसाठी त्यांच्या मोटीवेशनल व्हिडीओ मार्गदर्शक ठरत आहेत.भरकटलेला तरुणांच्या जीवनात बदल घडत आहे. इंस्टाग्राम या ॲप वरती एक लाख दहा हजार लोक त्यांच्या मार्गदर्शन पर व्हिडीओ ऐकण्यासाठी जोडले गेले आहे. तसेच ते जनजागृती, देशभक्ती, समाज प्रबोधन, स्त्री शिक्षणाचे महत्व, गो – रक्षा, बाल संस्कार, अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग संवर्धन, जल संवर्धन अध्यात्म आदी विषयावर आपल्या किर्तनातून समाज प्रबोधनाचे प्रभावी कार्य करीत आहेत. तसेच पिसे महाराज यांची साधी राहणी व ग्रामीण भागाशी व शेतकरी कुटुंबाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. सदरील पुरस्काराचे वितरण ७ जून रोजी राहूरी कृषी विद्यापीठ येथे राज्यातील विवीध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *