राहुरी वेब प्रतिनिधी,१० (शरद पाचारणे )-
दिनांक ३१ जानेवारी रोजी राहुरी फॅक्टरी येथे अण्णासाहेब मोरे सत्संग कार्यक्रमातून चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीने भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याचे वेगवेगळे गुन्हे राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यानी तात्काळ तांत्रिक विश्लेषण च्या आधारे या गुन्हेचा शोध कमी पोलीस पथक लावले .
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेली गोपनीय माहितीद्वारे 1) केसर सुखदेव जाधव, 2)गवळण पांडुरंग गायकवाड, 3)पूजा विशाल वाघमारे 4)पूजा विशाल मोहिते 5)महादेव रामदास जाधव, 6) रेखा दीपक पोटे सर्व रा.बीड यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने, त्यांना अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान, वरील आरोपींकडून त्यांनी चोरलेली रोख रक्कम, आधार कार्ड, पर्स, व दोन गुन्ह्यातील 5 व 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र एकूण 1,05,000/- रू किमतीचा मुद्देमाल बीड येथून जप्त केला होता.
सदरचा मुद्देमाल आज रोजी मा. न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी गयाबाई चांगले शेटे रा.देवळाली प्रवरा व इतर फिर्यादी महिलांच्या ताब्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.चोरी गेलेले मंगळसूत्र परत मिळाल्याने महिलांनी मानले राहुरी पोलिसांचे आभार .