राहुरी वेब प्रतिनिधी,१० (शरद पाचारणे)-
मागील काहीवर्षीप्रमाणे याहीवर्षी चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे व खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून त्यासाठी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या अशा सूचना आ.हेमंत ओगले यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.
शुक्रवारी आ. हेमंत ओगले यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरातील समर्थ बाबुराब पाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठक पार पडली. प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा बँक संचालक करण ससाणे, माजी सभापती सचिन गुजर, तहसीलदार नामदेव पाटील, कृषी उपविभागीय अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी सुदर्शन मुंडे, पंचायत समिती कृषी अधिकारी गणेश अनारसे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.हेमंत ओगले म्हणाले की, कृषि विभागामार्फत जे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविले जातात त्याचे संपूर्ण ३२ गावात सादरीकरण व्हावेत.
यंदा कापूस व मकाचे उत्पन्न वाढणार असल्याने कृषी विभागाकडून योग्य नियोजन व्हावे. शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनेपासून जे लाभार्थी शेतकरी वंचीत आहे.त्यांना त्या त्या योजनेबाबत लाभ मिळण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा कराव्या अशा सूचना आ.ओगले यांनी केल्या.
यावेळी माजी सभापती सुरेश निमसे, दत्तात्रय कडू, वैभव गिरमे, कृष्णा मुसमाडे, नानासाहेब कदम, भागवत मुंगसे,कारभारी होले, भास्कर कोळसे, ज्ञानेश्वर वाणी, बाबाकाका देशमुख , सुभेदार शेख,संजय वडीतके, जगन्नाथ वर्पे आदिंसह ३२ गावातील शेतकरी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.