भारताच्या राष्ट्रपती महोदयांद्वारे गठित केलेल्या सोळाव्या वित्त आयोगाचे चेअरमन व सदस्य यांनी आज महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. पुढील आर्थिक वर्षात या आयोगाने सुचवलेल्या शिफारसी लागू होणार आहेत. केंद्राने त्यांच्या करातील उत्पन्नापैकी किती वाटा राज्यांना द्यावा व राज्यांमध्ये वाटताना कोणती तत्वे अंगीकारावी याबाबत विस्तृत चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे माजी मंत्री श्री. राजेश टोपे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वाट्याला जास्त निधी कसा उपलब्ध होऊ शकेल याविषयी पक्षाच्या वतीने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुद्दे मांडले.