राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : तामिळनाडूतील चेन्नई येथील ऐतिहासिक जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील खेळाडूंनी देदीप्यमान यश संपादन करत पदकांची लयलूट केली. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या या स्पर्धेत देशभरातील १८ राज्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत राहुरीच्या आठ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.ऋषिकेश तारडे स्केटिंग अरेनामध्ये सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवान आणि अचूक खेळामुळे स्पर्धेत दमदार ठसा उमटवला. विविध गटांतील शर्यतींमध्ये त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत अनेक पदके पटकावली.
विजेत्यांची कामगिरी अशी
सार्थक बनसोडे: २००० मीटर रोड रेस – तृतीय, २००० मीटर रिले – तृतीय
अनिका सरोदे: १०० मीटर पॉईंट टू पॉईंट रोड रेस – द्वितीय, २००० मीटर रिले – तृतीय
आरुष पातोरे, मनस्वी पातोरे, सृष्टी गुलदगड, भूषण शेटे, संग्राम कोठुळे, आरव सरोदे: स्पीड स्केटिंग रिले – तृतीयग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चमक दाखवत महाराष्ट्रासह राहुरी तालुक्याचा गौरव वाढवला. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडावर्तुळात कौतुकाचा वर्षाव होत आहे.प्रशिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे या सर्व खेळाडूंना प्रशिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन व पालकांचे खंबीर पाठबळ लाभले. नियमित सराव, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावरच हे यश शक्य झाल्याची भावना पालक व प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते झळकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.