राहुरी वेब प्रतिनिधी,७ (शरद पाचारणे )-
जादू ही काही जादू नसते त्यामागे हात चालाकी विज्ञान असते भोंदूगिरी करणारे लोक याचा गैरफायदा घेऊन लोकांना फसवितात अशा अंधश्रद्धांपासून तरुणांनी दूर राहावे असे आवाहन नाशिक येथील विभागीय पोलीस तक्रार प्रधिकरणाचे तपासी अधिकारी आणि सुप्रसिद्ध जादूगार शिरीष कुमार जाधव यांनी केले राहुरी येथील आर. टी. एस. ए. स्केट्स अरेना च्या वतीने आयोजित स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत स्केटर्सच्या सत्कार समारंभ प्रसंगी श्री जाधव बोलत होते राहुरी येथील स्टेशन रोड लगत आयोजित कार्यक्रमाच्या वेळी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलचे स्पोर्ट्स डीन वीरूपक्ष रेड्डी आकांक्षा पाखले, उद्योजक संजय बिबवे, पत्रकार वसंतराव झावरे, आर .टी .एस. ए चे डायरेक्टर ऋषिकेश तारडे, रोहन तनपुरे , एडवोकेट विनोद शेटे राजेंद्र तारडे आदी उपस्थित होते.
शिरीष कुमार जाधव यांनी डोळे बांधून मोटरसायकल चालविणे यासह तलवारींसारखी वस्तू घशातून खाली सरकविणे ,हाताला लावलेली बेडी सहजासहजी उघडणे असे अनेक जादूचे प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली स्केटिंग च्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोटरसायकल मागे सुंदर स्केटिंग केले. याबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलचे स्पोर्ट्स डीन विरूपक्ष रेड्डी यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की आपल्या पाल्यांसाठी वेळ द्या त्यांच्या आहारावर लक्ष द्या मोबाईल टीव्ही पासून त्यांना दूर ठेवा. तुमची स्वप्ने त्यांच्यावर लादू नका उद्योजक संजय बिबवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी सुंदर बडबड गीत सादर केले. पत्रकार वसंतराव झावरे यांनी प्रमुख पाहुणे शिरीष कुमार जाधव यांचा परिचय करून दिला. आर. टी. एस .ए .चे डायरेक्टर ऋषिकेश तारडे यांनी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय ,गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ,टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ,ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपस्थितांना दिली . विशेष नैपुण्य मिळवलेल्या सार्थक बनसोडे, असित शिंगे यांच्यासह 150 स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भारदस्त पदक प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांना स्मृतिचिन्ह शाल देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने आरटीएसचे डायरेक्टर ऋषिकेश तारडे आणि सुनील पाले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून जयघोष करण्यात आला प्रमुख पाहुणे जादूगार शिरीष कुमार जाधव यांनी डोळे बांधून बुलेट मोटरसायकल चालविली. त्यांच्या समवेत रॅलीत विविध ध्वज घेऊन स्केटिंग चे विद्यार्थी सहभागी झाले होते. मच्छिंद्र लोखंडे सरांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांना अल्पउपहार देण्यात आला कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.