बारागाव नांदूर जामा मस्जिद ट्रस्टच्या अध्यक्षपदी नवाजभाई देशमुख

राहुरी वेब प्रतिनिधी ,२२ ( शरद पाचारणे )

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील अहेले सुन्नतवल जमात मुस्लीम पंच कमेटीच्या अध्यक्षपदी नवाजभाई देशमुख, उपाध्यक्षपदी पत्रकार रियाज देशमुख, सचिव नबाब पटेल यांची तर खजिनदार म्हणून अफसर (रिक्की) सय्यद यांची निवड सर्वानुमते घोषित करण्यात आली.

जामा मस्जिद मध्ये आयोजित बैठकीत महाराष्ट्र राज्य वक्फ संस्थेच्या आदेशानुसान नूतन पदाधिकारी निवडीसाठी संगनमताने चर्चा झाली. समस्त मुस्लीम बांधवांनी निवडीत पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय रहावा, कोणताही गट तट न राहता एकोपा रहावा म्हणून २१ ऐवजी २० संचालक निवडीचा निर्णय घेतला. सर्व संचालकांची नावे बिनविरोध घोषित करण्यात आली. अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार यांसह संचालक मंडळामध्ये बाबाभाई इनामदार, हमीदभाई इनामदार, इसाक बन्सी देशमुख, सरदारखाँ पठाण, हबीबभाई देशमुख, रज्जाक अल्लाबक्ष सय्यद, जिल्लूभाई पिरजादे, युसुफ भाई देशमुख, सलीमभाई देशमुख, डॉ. तन्वीर देशमुख, यासिन देशमुख (वायबी) लतीफ पटेल, सुलतान बालमखा पठाण, मुनीर शेख, शहाबुद्दीन काकर, फारूख काकर यांची सर्वानुमते निवड जाहिर झाली. मस्जिद, इदगाह, कब्रस्थान यांबाबत विकासात्मक कामकाज करण्याबाबत निवडीत पदाधिकार्‍यांनी एकत्रित कामकाज करण्याचा निर्णय घेतला.

अडिच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सचिव पदाची निवड करण्यात आली. बैठकीला मार्गदर्शक म्हणून अमिन देशमुख,   रफिकभाई इनामदार, बालम पठाण, नबीभाई देशमुख,  युसुफभाई इनामदार, अहमद पटेल, रहेमान देशमुख, अहमद पटेल, निसारभाई देशमुख, रियाज देशमुख, वसीम देशमुख, खतीबभाई देशमुख, यासिन पिरजादे, अमजद पिरजादे, बाबू रहेमान देशमुख, नजीर काकर, ग्रामपंचायत सदस्य सलीम काकर, शौकत इनामदार, बाबन इनामदार, शेख चांद देशमुख, गफुर देशमुख, बाबा पटेल, नदीम देशमुख, आरिफ देशमुख, नजीर शेख, सजनभाई शेख, सलीम शेख, राजू हावालदार, रफिक शेख, शब्बीर हावलदार, अनिस पटेल, बाबा पटेल, चांद पिरजादे, अस्लम पिरजादे, समीर पठाण, तमीज पठाण, अहमद देशमुख, फिरोज पठाण, सलीम पटेल, जमाल देशमुख, जमीर शेख, शकील काकर, बशिर शेख आदींसह समस्त मुस्लीम बांधव उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *