जैन मंदिर पडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी ! सकल जैन समाजाची निवेदनाद्वारे मागणी

मुंबई विलेपार्ले येथील जैन मंदिर जमीनदोस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व मंदिराचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी राहुरी येथील सकल जैन समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार संध्या दळवी यांना गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेद्वारे विलेपार्ले ( पूर्व ) कांबळीवाडी परिसरामधील २६ वर्ष पुरातन असे “श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर” येथे पोलीस बळाचा अनधिकृत पद्धतीने वापर करून अचानकपणे सदरील मंदिर उद्ध्वस्त केले गेले. ज्याबाबत संपूर्ण देशभरात जैन समाजात प्रचंड संताप तयार झाला आहे सदर मंदिर १९९८ मध्ये सर्व परवानगी घेऊन जैन परंपरेनुसार शांतता पूर्व पद्धतीने स्थापन करण्यात आले होते सदरील मंदिर जैन समाजातील लोकांचे आराधना केंद्र बनले होते व तिथे दररोज शेकडो भाविक पूजा अर्चना करीत होते ते मंदिर जैन समाजाचे धर्मनिष्ठा व आस्था चे प्रतीक होते इतके प्राचीन मंदिर अगदी दादागिरी पद्धतीने जमीनदोस्त करण्यात आले व त्या कारणाने संपूर्ण जैन समाजात नाराजी पसरली आहे संपूर्ण देशातील सकल जैन समाजाकडून निवेदन देत आहोत की या घटनेची तत्पर दखल घेऊन यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी वर्गावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व मंदिराचे पुनर्वसन सरकारद्वारे लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे या निवेदनावर संतोषकुमार लोढा,प्रकाश पारख,योगेश चूत्तर,किरण सुराणा ,आनंद देसरडा ,राहुल चूत्तर,जितेंद्र लुक्कड ,प्रतीक बोरा ,संजय बोगावत,मोहनलाल कोठारी ,पारस जैन ,निलेश चूत्तर,आशिष मुथा ,प्रशांत चूत्तर,डॉक्टर अरुणा भंडारी ,भाग्येश सुराणा ,प्रशांत नहार ,रुपेश सुराणा ,अमित राका ,सुभाष सावज,राजेंद्र मुथा ,किशोर सावज आदीच्या सह्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *