“बेस्ट कॉप” म्हणून पोलीस नाईक गणेश सानप यांची निवड

राहुरी वेब प्रतिनिधी,१९ ( शरद पाचारणे ) –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 100 दिवसांच्या कृती आराखडा उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी कर्मचारी यांची त्यांच्या कामातील प्रेरणा वाढवून सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक  दत्तात्रय कराळे नाशिक परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर  राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक  वैभव कलुबर्मे  यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी  बसवराज शिवपूजे  यांनी केलेल्या मूल्यांकनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश सानप यांची राहुरी पोलीस स्टेशन कडील मार्च 2025 चे बेस्ट कॉप म्हणून निवड केली . पोलीस पोलीस नाईक गणेश सानप यांनी फेब्रुवारी 2025 या महिन्यांमध्ये भाग 1 ते 5 चे 19 गुन्हे ,दारूबंदी चे 02 गुन्हे , अकस्मात मृत्यू चे 08 प्रकरणे असे एकूण 29 प्रकरणांची निर्गती केलेली आहे. त्यामुळे त्यांची राहुरी पोलीस स्टेशन कडील मार्च 2025  महिन्यातील बेस्ट कॉप म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचा माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी श्रीरामपूर येथे आयोजित क्राईम मीटिंग दरम्यान सन्मान केला व शुभेच्छा दिल्या. तसेच अशाच प्रकारे दर महिन्याला पोलीस स्टेशन स्तरावर “बेस्ट कॉप” ची निवड होणार असल्याने इतरही अधिकारी अमलदार यांनी अशाच प्रकारची भरीव कामगिरी करून पोलीस दलाची शोभा वाढवावी अशा शुभेच्छा दिल्या.
बेस्ट कॉप अवॉर्ड मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन कडील इतर अधिकारी अंमलदार यांनी पोलीस नाईक गणेश सानप यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *