कुरणवाडी व १९ गाव पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षपदी सयाजी श्रीराम यांची निवड

राहुरी वेब प्रतिनिधी,१३ (शरद पाचारणे ) –
कुरणवाडी व १९ गाव पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षपदी भाजपाचे सयाजी कारभारी श्रीराम यांची निवड करण्यात आली आहे. संख्या बळ असताना माजी आ.प्राजक्त तनपुरे गटाचा पराभव झाला आहे.
राहुरी तालुक्यातील गुहा, तांभेरे, तांदूळनेर, वडनेर, कणगर चिंचविहिरे, गणेगाव, वरशिंदे, वाबळेवाडी, ताहाराबाद, चींचाळे, घोरपडवाडी, मल्हारवाडी, मोमीन आखाडा आदी गावांना या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर योजनेवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या गटाची एकहाती सत्ता होती. रघुनाथ मुसमाडे हे अध्यक्ष पदी होते. परंतु त्यांच्या काळात निधी न मिळाल्याने योजना सुरळीत चालत नव्हती व लाभार्थी गावांना पाणीपुरवठा होत नव्हता यामुळे इतर सदस्यांमध्ये नाराजी होती आदी कारणांमुळे मुसमाडे यांनी राजीनामा दिला होता. त्यानुसार गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन अध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष पदासाठी सयाजी श्रीराम व सुखदेव बलमे यांनी अर्ज दाखल केले. यामध्ये श्रीराम यांना १३ मते तर बलमे यांना १२ मते मिळाली. सयाजी श्रीराम एका मताने विजयी झाले. एकूण २६ असून निवडी प्रसंगी २५ सदस्य उपस्थित होते. संख्या बळ असताना देखील तनपुरे गटाला विजय मिळवता आला नाही. तनपुरे गटाची ४ मते फुटल्याची चर्चा यावेळी परिसरात होत आहे. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष सयाजी श्रीराम यांनी सांगितले की, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, आ.शिवाजीराव कर्डिले, माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील तसेच योजनेच्या १३ सदस्यांनी आपल्यावर विश्वास दाखविला, धनगर समाजाला प्रतिनिधीत्व दिले याबद्दल सर्वांचे आभार मानतो. योजना सुरळीत चालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
यावेळी योजनेचे सदस्य भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सर्जेराव घाडगे, बापूसाहेब मुसमाडे, सागर मुसमाडे, मारुती नालकर, नानासाहेब करमड, बापूसाहेब गडदे, सिमाताई घाडगे, शोभाताई भनगडे, लताबाई बलमे, लताबाई गडधे, अरुणाबाई ओहोळ, विमलबाई शिंदे, मच्छिंद्र कदम, संजय शिंदे, कमल गभाले, सिताराम झावरे, निवृत्ती घनदाट, मच्छिंद्र गावडे, मंगेश गाडे, गंगूबाई मुसमाडे, दिपक वाबळे, योजनेचे सचिव राजेंद्र मेहेत्रे, ग्रामसेवक अभिजित पिंपळे, रविंद्र पवार, अनिल करपे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *