राहुरी पोलिसांच्या ३ महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर, अपहरीत अल्पवयीन मुलीची सुटका

राहुरी प्रतिनिधी ( शरद पाचारणे )-

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याबाबतच्या गुन्हा दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची चक्र फिरवत आपल्या तपास पथकाला या अपहरित मुलीचा शोध घेण्यासाठी सूचना केल्या, परंतु सदर अपहरित अल्पवयीन मुली बाबत काही एक माहिती उपलब्ध नसताना राहुरी पोलिसांनी मोठ्या मोठ्या शिताफिने गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे अथक प्रयत्न करून अपहरत मुलीला शोधून तिची सुटका करण्यात आली. याबाबत सदर अल्पवयीन पीडित मुलीचा राहुरी पोलीस स्टेशनला आणून जबाब नोंदवून तिचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहे . या गुन्ह्यात वाढीव कलम लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी आदिनाथ गीताराम निशाने राहणार खूडसरगाव तालुका राहुरी यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील ,पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपने हे करत आहेत.
चौकट-
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील 55 मुलींचा शोध घेऊन व 6 अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे तसेच अल्पवयीन मुला/मुलीना अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *