राज्यस्तरीय सोळाव्या साहित्य संमेलन संपन्न

अहिल्यानगर वेब टिम –
“संयमाने जगणे शिकण्यासाठी कविता हे चांगले माध्यम असून शब्दगंधने नवोदितांना कवितांच्या रूपाने एकत्रपणे बांधले आहे,शब्दगंधचे सातत्यपूर्ण उपक्रमाने मराठी भाषा समृद्ध होण्यासाठीचे प्रयत्न निश्चितच वाखाण्याजोगे आहेत.” असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सोळाव्या साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.यावेळी विचारपिठावर संमेलनाध्यक्ष संजीवनी तडेगावकर,स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.राजेश गायकवाड,ज्ञानदेव पांडुळे,शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी इ.मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या काव्य संमेलनामध्ये लक्ष्मण पाटील,विनोद शिंदे,शिरीष जाधव,मारुती सावंत,सुदर्शन धस,जयश्री झरेकर,रामदास कोतकर,जयश्री मंडलिक, पी.एन.डफळ,वर्षा भोईटे,डॉ.मच्छिंद्र मालुंजकर, वंदना साळुंखे, प्रकाश शेंडगे, डॉ. विनय पिंपरकर, सुनील धस,सुनिता पालवे,नवनाथ वाळके,डॉ.सुदर्शन धस,सुजाता पुरी,सुरेखा घोलप,शरद धलपे,दशरथ शिंदे,रुक्मिणी नन्नवरे,कृष्णकांत लोणे,नजमा शेख,ऋता ठाकूर,देविदास बुधवंत,वर्षा रोडे,प्रमोद येवले,पांडव पुरी,सुमेध ब्राह्मणे,स्वाती मुळे,क्रांती करंजगीकर, दुर्गा कवडे, प्रबोधिनी पठाडे, समृद्धी सुर्वे,दिलीप सरसे, बाळासाहेब बनसोडे,राजेंद्र उधारे,हर्षल आगळे,ज्योती गोसावी,कल्पना निंबोकार, रेखा दहातोंडे ,जीवन कुंदे, समृद्धी थोरात, दादा ननवरे, महादेव लांडगे, बाळासाहेब घोरपडे, मनीषा सोनवणे, सुनीता कोठाडीया यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन कर्जत येथील कवयित्री स्वाती पाटील व पारनेर येथील कवयित्री स्वाती ठुबे यांनी केले. सर्वांना आपल्या स्वच्छ हस्ताक्षरात प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रमाणपत्र लिहून दिले.यावेळी माजी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,डॉ.अशोक कानडे,प्राचार्य जी.पी.ढाकणे,एल.बी.जाधव,भारत गाडेकर, डॉ.तुकाराम गोंदकर.प्रा.डॉ.अनिल गर्जे,बबनराव गिरी,सुभाष सोनवणे, राजेंद्र पवार,राजेंद्र चौभे,प्रशांत सूर्यवंशी व पंडितराव तडेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या काव्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश राऊत,हर्षल गिरी,दिशा गोसावी,स्नेहल रूपटक्के, भाग्यश्री राऊत,कल्याणी सावंत,निखिल गिरी,अंजली खोडदे,अमोल उदागे, यज्ञजा गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *