राहुरी वेब प्रतिनिधी,१० (शरद पाचारणे )-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी शहरप्रमुख गंगाधर सांगळे यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन व वृक्षारोपण करून वाढदिवस संपन्न झाला. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड हे होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. भांड म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख ना. एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीत अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोव्हीड काळामध्ये त्यांनी केलेल्या कामांचा राहुरी तालुक्यातील शिवसैनिकांनी आदर्श घेत त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचा एक आदर्शवत निर्णय घेतलाबद्दल तालुक्यातील सर्व शिवसैनिकांचे श्री. भांड यांनी कौतुक केले. व आगामी काळातही ना. शिंदे यांच्या विचारधारेशी संलग्न राहून विविध सामाजिक उपक्रम राबवत रहावे असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना अनुसूचित जाती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा उपप्रमुख आण्णा म्हसे, शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव, माजी नगरसेवक अरुण साळवे, संस्थेच्या संचालिका भारती खिलारी, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष किशोर मोरे, बाळासाहेब येवले, डॉ.विजय मोरे, श्री.जाधव, विकास काशीद, गोरक्षनाथ सिन्नरकर, संजय साळुंके, ढोकणे मेजर आदी उपस्थित होते. यावेळी गाडगे महाराज आश्रम शाळेतील मुलांनी केक कापून उपमुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आश्रम परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशुतोष शिंदे, ओंकार डागवाले, ऋषि ताकटे, वैभव भागवत, पांडुरंग पठारे,कांती वराळे, ओम तनपुरे, विजय झावरे, सुरज गडधे, सारंगधर सांगळे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.