राहुरी वेब प्रतिनिधी,९( शरद पाचारणे )-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून राहुरी तालुकाध्यक्षपदी स्नेहल दिवे तर जिल्हाध्यक्षपदी सीमा बोरुडे व राहुरी तालुकाउपाध्यक्षपदी सपना ढोलमपुरे यांची निवड करण्यात आली आहे.
संगमनेर येथे शासकीय विश्रामगृह येथे आरपीआयचे राज्याचे सचिव विजय वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राहुरी तालुकाध्यक्षपदी स्नेहल दिवे तर जिल्हाध्यक्षपदी सीमा बोरुडे व राहुरी तालुकाउपाध्यक्षपदी सपना ढोलमपुरे यांना जबाबदारी देण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष थोरात यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे १५ फेब्रुवारी रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे येणार असून जिल्ह्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा व जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या ७५ व्या अभिष्टचिंतनसोहळ्यानिमित्त विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आरपीआय पक्ष व फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीमध्ये येत्या काळात प्रामाणिकपणे कार्य करून समाजातील महिलांचे संघटन वाढवून पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असे जिल्हाध्यक्षा सीमा बोरुडे व तालुकाध्यक्ष स्नेहल दिवे यांनी सांगितले.