राहुरी वेब प्रतिनिधी,१० (शरद पाचारणे )-
डॉ बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय कारवाडी येथील शाळेतील २ मुलींची पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे व संस्थेच्या सचिव डॉ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कारवाडी (मालुंजे )सारख्या ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयातील २माजी विद्यार्थिनीची पोलीस म्हणून निवड झाली असून त्यात पूजा बाजीराव पवार, व भक्ती बाजीराव पवार अशी त्यांची नावे असून त्या याच शाळेतून १० वी १२ वीचे शिक्षण घेऊन त्याची पदवी संपादन करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची नुकतीच पोलीस दलात निवड झाली. त्यातील भक्ती पवार हिने पोलीस निरीक्षक पदाचीही पहिली परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या मुलींची आई सौ सुभद्रा बाजीराव पवार ह्या याच शाळेच्या १९९४ च्या बॅचच्या विद्यार्थिनी आहे. भक्ती पवार प्रतिक्रिया देताना म्हणाली की प्रसाद तनपुरे यांनी जर कारवाडी (मालुंजे )सारख्या नव्हे तर तालुक्यातील ग्रामीण भागात शाळा सुरु केली नसती तर आज आम्ही शेती कामे करीत बसलो असतो. त्यांचे ग्रामीण भागातील मुलींवर फार मोठे उपकार आहे असेच म्हणावे लागेल.मुलींच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी पवार भगिनीचे पालक बाजीराव पवार शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब निवडुंगे, प्रदीप तनपुरे व कैलास शेटे उपस्थित होते.