राहुरी वेब प्रतिनिधी,०७( शरद पाचारणे ) –
केशरनगर, भुजाडी इस्टेट, वृंदावन नगर व मुनीर नगर मधील नागरिक केशर नगर मधील केशर सांस्कृतिक भवनांमध्ये क्रीडा भवन तयार करणे मागणी केली होती त्या मागणीचा राहुरी नगर पालिकेच्या तत्कालीन पदाधिकारी यांनी मान्य केली होती.प्रलंबीत मागणीचा विचार करावा यासाठी त्या भागातील नागरिकांनी आज मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचेकडे केली आहे. केशर नगर मध्ये नगरपालिकेचे केशर सांस्कृतिक भवनांमध्ये आमच्या केशरनगर, भुजाडी इस्टेट, वृंदावन नगर व मुनीर नगर मुले बॅडमिंटन, योगासने, क्रिकेट, टेनिस खेळत आहेत. तसेच आमच्या कॉलनीतील छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम या जागेमध्ये होत आहे. तरी या जागेमध्ये कुस्तीचे मैदान, २०० मीटर रनिंग ट्रॅक व बास्केटबॉल इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्यावे. यासाठी दिनांक २/९/२०२१ रोजी नगरपालिकेच्या तत्कालीन सदस्यांनी तसा ठराव केलेला आहे तरी त्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी तसेच त्याच्या वापरामध्ये कोणताही बदल करू नये. असे निवेदनात नागरिकांनी म्हंटले आहे. या निवेदनावर सी ए सुरेश डौले, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, अर्जुन कल्हापुरे, कारभारी सांगळे, मकरंद रायते सर, अविनाश साबरे, आबासाहेब गडढे , राजेंद्र ससाणे, जितेंद्र मेटकर,आकाश चव्हाण, संजूदादा राठोड,विट्टलराव गाडे, विजय खेडेकर, बाळासाहेब गागरे, श्रीनिवास खर्डे, राम ढोकणे, अशोक आघाव, संतोष मुंडलिक, गोरख साळवे, बाळाजी पानसंबळ, राजेंद्र म्हसे, गणेश उदावंत, प्राचार्य रामकिसन ढोकणे, भीमराज मंडलिक, देविदास देशमुख, प्रभाकर येवले, आशुतोष ढुमणे, राहुल फिरोदिया, देवीचंद राजभोज, मंगेश पगारे, मंगेश देडगे, जगन्नाथ बाचकर,शरद कदम, निवृत्ती इले,राजेंद्र दुगड, संतोष हिरण,भवन पटेल, यांचे सह माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे नंदकुमार तनपुरे, सोन्याबापू जगधने आदी उपस्तिथ होते .