राहुरी वेब प्रतिनिधी,१८( शरद पाचारणे )-
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन राहुरी पोलीस स्टेशन स्तरावर आठवड्याचे प्रत्येक शनिवारी आयोजन करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने तक्रार निवारण दिन आज दि. 18/1/2025 रोजी 11.00. वा ते 13.00 वा दरम्यान करण्यात आलेले होते .त्यांच्या तक्रारी एकूण घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. एकूण 111 तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल गॅरेज वाले, मोबाईल विक्री दुरुस्ती करणारे दुकानदार, रेडियम दुकानदार यांनाही मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना देण्यात आलेले आहे.