राहुरी वेब प्रतिनिधी,१६(शरद पाचारणे )-
शिवांकुर विद्यालयाचा इंटरमिजिएट व एलिमेंट्री या चित्रकला परीक्षेमध्ये शंभर टक्के निकाल लागला. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यालयातून इंटरमिजिएट परीक्षेसाठी 22 विद्यार्थी बसले होते त्यामधील ए ग्रेडमध्ये 1, बी ग्रेडमध्ये 2 व सी ग्रेडमध्ये 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व तसेच एलिमेंट्री परीक्षेमध्ये 26 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये ए ग्रेडमध्ये 1, बी ग्रेडमध्ये 20, सि ग्रेटमध्ये 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार व सचिव डॉ.प्रकाश पवार यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना कला शिक्षिका श्रीमती रोहिणी भाकरे यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे, रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, दुर्गा वाघचौरे साक्षी शिंदे, अंजली धोंडे व लिपिक भाग्यश्री झांबरे, शिपाई शारदा तमनर, परिवहन विभाग प्रमुख अशोक गाडे आदींसह बहुसंख्य पालक उपस्थित होते.