राहुरी प्रतिनिधी,२० ( शरद पाचारणे )-
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी भिमाशंकर दुधाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली .आज सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी ह्या निवडीसाठी सरपंच सुजाता अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायतचे ग्रामसेविका पठाण मँडम यांच्या उपस्थितीत निवड झाली. तसेच माजी राज्यमंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे यांचे निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहा सदस्य उपस्थित होते तसेच बाकिचे सदस्य गैरहाजर होते, उपस्थित सदस्य डॉ.शशिकांत गागरे, रंजना विधाटे, वंदना जाधव , प्रमिला पारधे , शिवाजी बर्डे, भिमाशंकर दुधाट व सरपंच सुजाता अरुण पवार उपस्थित होते उपस्थित पैकी सुचक शिवाजी बर्डे व अनुमोदन डॉ शशिकांत गागरे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर मार्केट कमिटीचे माजी सभापती बापुसाहेब पाटील गागरे, तंटामुक्ती अध्यक्ष गहीनिनाथ हुलुळे, शिवसेनेचे नेते दत्तात्रय गागरे पाटील,युवक कार्यकर्ते अशोक कर्डे , म्हैसगाव सोसायटीचे चेअरमन सावित्रा गुलदगड , नानासाहेब विधाटे, नामदेव जाधव,सकाहारी आग्रे, चांगदेव चोपडे, नाना गागरे,कारभारी गागरे, स्वप्निल गागरे संतोष ढगे, धनंजय गागरे, राधा मुसळे, सुभाष गुलदगड,भाऊ बर्डे, एकनाथ विधाटे,प्रशांत दुधाट, स्वप्निल गागरे, किशोर दुधाट, मच्छिंद्र लेंभे,धोडिभाऊ विधाटे, दिपक विधाटे,सुदाम शेलार, किशोर दुधाट,लहाणु पारधे, मच्छिंद्र पारदे, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.