राहुरी वेब प्रतिनिधी,१३ ( शरद पाचारणे ) –
राहुरी पोलीस स्टेशनने संक्रांतीनिमित्त उडवण्याबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत ४ शाळांमधील सुमारे २००० विद्यार्थ्यांना समक्ष भेटून प्रबोधन केले.
तसेच तालुक्यातील शाळा प्रशासनाला गटविकास अधिकारी मुंडे साहेब व गटशिक्षणाधिकारी तुंबारे साहेब यांच्यामार्फत आवाहन करून विद्यार्थ्यांना पतंग उडवताना घ्यावयाची खबरदारी व नायलॉन मांजा न वापरण्याबाबत शपथ घेण्याबाबत आवाहन केले असता. तालुक्यातील सुमारे 350 शाळांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला व .सुमारे 10000 विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची व सुरक्षित पतंग उडवण्याची शपथ घेतली शपथ मसुदा
“आम्ही पतंग उडवताना आमच्या व इतर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेवु. आम्ही पतंग उडवल्यास आमचा तसेच इतर कुणाचा ही अपघात होणार नाही याची खबरदारी घेवु.तसेच पतंग उडवताना आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही, इतरानाही वापरू देणार नाही. तसेच कुणी नायलॉन मांजा वापरत असल्यास / विक्री करत असल्यास त्याची माहिती वडीलधाऱ्या मंडळींना, गावातील पोलीस पाटील यांना, पोलिसांना तसेच वर्ग शिक्षक यांना माहिती देवू.”
अशा प्रकारे राहुरी पोलीस व शिक्षण विभाग यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नायलॉन मांजा न वापरण्याबाबत प्रबोधन केले.तसेच गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना दवंडी देऊन मांजाचा वापर न करता सुरक्षितपणे पतंग उडवावे असे आवाहन केले. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलवरमे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, सहायक फौजदार अंबादास गीते, पोलिस हवालदार अशोक शिंदे,संदीप ठाणगे ,शकूर सय्यद, आजिनाथ पाखरे, नदीम शेख, प्रमोद ढाकणे ,सचिन ताजणे यांच्या पथकाने गटविकास अधिकारी मुंडे साहेब व गटशिक्षणाधिकारी तुंबारे साहेब यांच्या व सर्व पोलीस पाटील यांच्या समन्वयातून केली.राहुरी पोलीस स्टेशन चे हद्दीमध्ये कुणी मांजा विक्री करत असल्यास संपर्क साधा 9552105100 / 8788891147