राहुरी वेब प्रतिनिधी ,१३( शरद पाचारणे ) –
अत्यंत कमी कालावधीत नगर जिल्ह्यात अग्रगण्य ठरलेल्या साई आदर्श मल्टीस्टेटने बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे सामाजिक क्षेत्रातही संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचे मोठे योगदान असून ही संस्था अन्य संस्थांसाठी निश्चित मार्गदर्शक ठरेल अशी प्रतिपादन अंबरनाथ नगर परिषदेचे मा. अध्यक्ष शिवसेना नेते अरविंद वाळेकर यांनी केले. राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेत त्यांनी सदिच्छा भेट दिली प्रसंगी ते बोलत होते संस्थेच्या सभागृहात साई आदर्शचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी त्यांचा सन्मान केला याप्रसंगी दिपक त्रिभुवन,प्रकाश डावरे, पद्माकर दिघे, आरुणकुमार सिंग, प्रदिप सिंग,सचिन जाधव आदी उपस्थित होते.
साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या नेतृत्वामुळे साई आदर्श मल्टिस्टेटचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. त्यांच्या या कार्यामुळे निश्चितच समाजात चांगुलपणा शिल्लक असल्याचे दिसून येते.संस्थेच्या नफ्यातील काही रक्कम समाजसेवेसाठी खर्ची करणारे शिवाजीराव कपाळे यांच्यासारख्या व्यक्तीमत्वांना भविष्य उज्वल असल्याचेही वाळेकर म्हणाले
याप्रसंगी विक्रम जाधव ,प्रसाद गाढे, अशोक औटी,रवींद्र झावरे,प्रधान तेजस्वी ,पवळे राणी,गाडेकर रुपाली,औटी मुकता,तनपुरे नूतन आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन याकूब शेख यांनी तर आभार गोपीनाथ हारगुडे यांनी मानले.