राहुरी वेब प्रतिनिधी,०९ (शरद पाचारणे)-
अध्यात्मिक व एकोप्याने नांदनार गाव म्हणून देवळाली प्रवरा शहराची परंपरा आहे. धार्मिक व सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचे प्रामाणिक कार्य हे साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असल्याचे गौरवोद्गार महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले.
देवळाली प्रवरा शहरात गेल्या ७ दिवसापासून सुरू असलेल्या साई उत्सव अर्थात साई चरित्र पारायण व कीर्तन महोत्सवाची काल गुरुवारी सकाळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.प्रसंगी ते बोलत होते.
गेल्या सात दिवसात देवळाली प्रवरात भक्तिमय वातावरण पहावयास मिळाले.लहान-थोरांनी सप्ताहात आनंदाने सहभागी होऊन आनंद लुटला.साई पारायण व कीर्तन महोत्सवामुळे अध्यात्मिक व एकोप्याची परंपरा पुढे नेली जात आहे.ना..अध्यक्ष ना उपाध्यक्ष अशा साई प्रतिष्ठानचे कार्य महाराष्ट्राला प्रेरणा देणारे असल्याचे महंत उद्धव महाराज मंडलिक म्हणाले.
यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी उपस्थित भाविकांना आपल्या ओजस्वी वाणीतून काल्याच्या किर्तनात अनेक प्रमाण व दाखले देऊन मंत्रमुग्ध केले. दहीहंडी फोडल्यानंतर किर्तनसेवा पार पडली.हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक, उद्योग क्षेत्रातील मंडळी व सप्ताह कालावधीत सहकार्य करणारे दानशूर मंडळी उपस्थित होते. यावेळी सप्ताहासाठी योगदान देणाऱ्या मंडळीचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री साई प्रतिष्ठान सदस्य व शहरवासीयांनी अथक परिश्रम घेतले.