रस्त्याच्या वादातून केलेल्या खुनाच्या आरोपी शिवराम मारुती शिंदेला जन्मठेप.

बेलवंडी वेब टिम,०९ –

रस्त्याच्या वादातून केलेल्या खुनाच्या आरोपीला तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या योग्य तपासामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत हकीगत अशी की दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलवंडी पोलीस ठाणे अंतर्गत असलेले श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमला येथील गणपत बजाबा शिंदे वय 79 वर्ष राहणार अरणगाव दुमला तालुका श्रीगोंदा हे दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरणगाव दुमाला शिवारातील शामराव धोंडीबा शिंदे यांच्या शेताच्या बांधावर गुरे चारत बसलेले असताना आरोपी शिवराम मारुती शिंदे राहणार अरणगाव दुमला यांनी रस्त्याच्या वादावरून त्यांना हातातील दगडाने मारून त्यांचा खून केला अशी फिर्याद मयताचा मुलगा मुकिंदा गणपत शिंदे वय 40 राहणार अरणगाव दुमला याने दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुराव्याचे आधारे आपल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे,पोलीस उपनिरीक्षक मारुती कोळपे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल जावेद शेख ,महिला पोलीस कॉन्स्टेबल सुरेखा वलवे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंपणकर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पवार, पोलीस कॉन्स्टेबल संदीप दिवटे यांच्या पथकाला पाठवून आरोपी शिवराम मारुती शिंदे याला तात्काळ दोन तासात शिताफीने गजाआड केले होते.सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास योग्यरित्या करून याबद्दलचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते, आरोपीला शिक्षा होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती . या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे /गायके यांनी कामकाज पाहिले या प्रकरणी सरकारी वकिलांनी केलेले युक्तिवाद व न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राह्य धरून श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालय यांनी आरोपी याला भादवि कलम 302 अन्वये जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली सरकार पक्षातर्फे महिला हेडकॉन्स्टेबल सुजाता गायकवाड तसेच महिला हेडकॉन्स्टेबल आशा खामकर यांनी सहकार्य केले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या योग्य तपासामुळेच आरोपी शिवराम शिंदे याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे सध्या राहुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्यांनी राहुरीच्या पदभार घेतल्या पासून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीला आळा बसवला आहे. मयत गणपत शिंदे च्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याने बेलवंडी परिसरातून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कामावर समाधान व्यक्त होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *