राहुरी वेब प्रतिनिधी,०९( शरद पाचारणे )-
राहुरी तालुक्यातील नावाजलेल्या आदर्श गाव गणेगाव येथील वाणी शैक्षणिक संकुलात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे स्वागत करण्याचा गौरव करण्यात आला. यावेळी वाणी स्कुलचे संचालक दत्तात्रय वाणी, आदिनाथ प्राचार्य सोनिया जोसेफ , उपप्राचार्य कडू सर आदी उपस्थित होते.
पो.नि. संजय ठेंगे यांनी मोबाईल फोनवर विचारप्रवर्तक चर्चेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी या तंत्रज्ञानाचे दुहेरी स्वरूप अधोरेखित केले आणि ते शिक्षण आणि कनेक्टिव्हिटीसाठी एक शक्तिशाली साधन कसे असू शकते हे दाखवून त्याचा गैरवापर करण्यापासून सावधगिरी बाळगली, ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते आणि सुरक्षिततेची चिंता होऊ शकते असे सांगितले
तसेच रस्ता सुरक्षा नियमांचे प्रशिक्षण दिले, वाहतूक नियमांचे पालन करणे, हेल्मेट आणि सीटबेल्ट घालणे आणि रस्ता ओलांडताना सावध राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.