राहुरी वेब प्रतिनिधी ,०९(शरद पाचारणे)-
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, संवर्धन, प्रचार, प्रसार, व जोपासणा करणेसाठी राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या पत्रानुसार, आहिल्यानगर जिल्हा नगरपरिषदस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दि.27 डिसेंबर 2024 ते रविवार 29 डिसेंबर 2024 या दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतमधील 900 अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घेतलेला होता, या विविध खेळ स्पर्धा क्रिकेट, रस्सीखेच, बॅडमिंटन, टेबल टेनिस, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, रनिंग व रिले, स्विमिंग, बुद्धिबळ, कॅरम, कविता, चारोळी, रांगोळी, समूह गायन, वैयक्तिक व समूह नृत्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
राहुरी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्याधिकारी श्री. ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेत भाग घेतला होता, या स्पर्धेत स्वतः मुख्याधिकारी श्री. ज्ञानेश्वर ठोंबरे याच्यासह, राजेंद्र जाधव, राजेंद्र पवार, राहुल जाधव, विजय बिवाल, बाळासाहेब पवार, बाबासाहेब राऊत, प्रियंका गर्जे, शिला राहिंज, उषा कोंढार, प्रतिभा गायकवाड, राजश्री महाजन, मनीषा कोळपकर, योगिता भालेराव, लता धनेघर, मंगल सरोदे, अनिता पवार, संध्या खंडागळे, शितल गायकवाड, चित्रा वाव्हळ आदी स्पर्धकांना विविध खेळांमध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एकूण 34 बक्षीस मिळाले आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि.8 जानेवारी 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी झाला.
मा. सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, मा. आशिष येरेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर, मा. श्री. यशवंत डांगे अहिल्यानगर मनपा आयुक्त यांच्या उपस्थित करण्यात आला. विविध खेळांमध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुख्याधिकारी श्री. ज्ञानेश्वर ठोंबरे याच्या नेतृत्वात भाग घेतलेल्या राहुरी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांना सर्वात जास्त म्हणजे 34 बक्षीस मिळाली असुन अहिल्यानगर जिल्ह्यात सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक मिळाला, त्याबद्दल मा.श्री. सिद्धराम सालीमठ जिल्हाधिकारी, मा. आशिष येरेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद मा.श्री. यशवंत डांगे अहिल्यानगर मनपा आयुक्त, मा. जिल्हा सहआयुक्त खांडकेकर साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.