राहुरी वेब प्रतिनिधी,०८,( शरद पाचारणे )
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसियन आयोजीत १४ वर्षे वयोगटातील मुले व मुलीच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक येथे ४ ते ६ जानेवारी रोजी पार पडली एकूण २९ जिल्हे । महानगरपालिका च्या टीम सहभागी झाल्या होत्या फायनल मॅच सातारा विरुद्ध अहिल्यानगर मध्ये सामना झाला त्यात अहिल्यानगर उपविजयी झाला शार्दुल पाखरे याने पहिला सामना नंदुरबार विरुद्ध १५ बॉल मध्ये ५० दुसरा सामना ठाणे विरुद्ध २६ बॉल मध्ये ७० रन तिसरा सामना ३६ बॉल मध्ये ९० रन पुणे बरोबर सामन्यामध्ये उत्कृष्ठ खेळी खेळली व तीनहि मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाली व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ज्ञानगंगा स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. गोरे सर व उपप्राचार्य धस सर यांचे मार्गदर्शन या खेळाडूस मिळाले. आणि ज्ञानगंगा स्कूलचे प्राचार्य मिसाळ सर यांनी या खेळाडूचे कौतुक केले व अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.