सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा मानाचा “सावित्रीकन्या” पुरस्कार कु. अमोदिनी गायकवाड हिस प्रदान

राहुरी वेब प्रतिनिधी,०७ ( शरद पाचारणे ) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मानाचा समजला जाणारा यावर्षीचा “सावित्री कन्या” पुरस्कार कु.अमोदिनी जयप्रकाश गायकवाड हिस प्रदान करण्यात आला.
दि. 3 जानेवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, पुणे मनपा आयुक्त सुनिल पांढरे, शिक्षण मंडळाचे सभापती डॉ.प्रमोद रसाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.महानंद माने यांच्या हस्ते कु.अमोदिनी जयप्रकाश गायकवाड हिस सावित्रीकन्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कु.अमोदिनी हि इ.१० वी ची विद्यार्थिनी आहे. इ.५ वी ते १० वी पर्यंतचे पाच विभागात एकूण १०० गुणांचे मूल्यांकन केले गेले. यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा व विद्यार्थी वागणूक अशा पाच विभागात गुणांकन होते. महात्मा फुले विद्यापीठाचे कुलगुरू पी.जी. पाटील, सचिव तसेच शाळेचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा.जितेंद्र मेटकर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु.अमोदिनी हीचे अभिनंदन केले आहे. कु. अमोदिनी ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, धुळे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.जयप्रकाश गायकवाड व वने वस्ती जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कांडेकर-गायकवाड यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *