छत्रपती प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा

राहुरी वेब प्रतिनिधी,०६ ( शरद पाचारणे ) – गेल्या १२ वर्षांपासून विविध क्षेत्रात योगदान देणार्‍या छत्रपती प्रतिष्ठानच्या यावर्षीच्या पुरस्कारांची काल घोषणा झाली. गुरुवार दि.२३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता उंबरे येथे सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते व खासदार नीलेश लंके, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, पै. रावसाहेब खेवरे, भारत महाराज कैकाडी, पंढरपूर श्री सागर बेग. संस्थापक अध्यक्ष श्रीराम सेवा संघ.. श्री उदय सिंह पाटील आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे हे असतील, अशी माहिती प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष सौ विद्या ताई करपे व खजिनदार श्री शरद राव ढोकणे. यांनी दिली. छत्रपती प्रतिष्ठानची २०१३ मध्ये स्थापना झालेली आहे. आजपर्यंत प्रतिष्ठान वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. यात दरवर्षी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. यावर्षीच्या निवडी काल जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला सबलीकरण क्षेत्रात आमदार मोनीका राजळे (शेवगाव-पाथर्डी), युवा ऑयडॉल विक्रमसिंह पाचपुते (श्रीगोंदा-नगर), विधीज्ज्ञमध्ये अ‍ॅड. राहुल कर्पे (श्रीसंभाजीनगर), वैद्यकीय डॉ. सतीश सोनवणे (नगर), प्रशासनातील अधिकारी समर्थ शेवाळे, (जि.प) साहित्य क्षेत्रात डॉ. संजय कळमकर (नगर), उद्योजक म्हणून गणेश शिंदे (नेवासा), धार्मिक क्षेत्रात नवनाथ महाराज म्हस्के (बाभळेश्वर), शैक्षणिक संगीता कुरकुटे (देवळाली प्रवरा), कृषी बाळासाहेब खुळे, (वळण), संपादकीय दीपक रोकडे (पुढारी, नगर), स्पेशल प्रेस स्टोरी शशी पवार (जेऊर, पुण्यनगरी),ग्रामीण पत्रकारीता भाऊसाहेब काळे (सार्वमत, श्रीरामपूर), इलेक्ट्रॉनिक मिडीया कुणाल जायकर, (टिव्ही नाईन, नगर), चित्रकार प्रा. मंगेश गायकवाड (कोपरगाव), भूमिपूत्र अशोक पागीरे, अर्थतज्ज्ञ रवींद्र ढोकणे (सीए),तसेच सहकारातील यावर्षीची उत्कृष्ठ संस्था म्हणून जि.प. कर्मचारी सोसायटी, नगर, आणि स्वच्छ गाव सुंदर गाव म्हणून नावारुपास येत असलेल्या कानडगाव ग्रामपंचायतीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
गुरुवार दि.२३ रोजी उंबरे येथे या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख उपस्थित म्हणून भा.ज.पा.ता अध्यक्ष सुरेश बनकर.. शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे. शिवसेना तालुका प्रमुख.ऊबा.ठा. सचिन म्हसे ,विक्रम तांबे, सुरेश लांबे आदींसह भा.ज.पा.चे.ता. उपाध्यक्ष संतोष ढोकणे, संजय आडसुरे, शरद कोळसे,माजी चेअरमन दत्तात्रय ढोकणे, सोपान काका दुशिंग, अमोल गुंजाळ, गोरक्षनाथ ढोकणे, नाना खंडू ढोकणे, गणेश तोडमल, संदीप गायकवाड, एकनाथ वाघ आदींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *