राहुरी वेब प्रतिनिधी ,६ (शरद पाचारणे )-
गुहा येथील प्रेरणा सहकारी पतसंस्थेच्या तांभेरे येथील शाखेचा रौप्य महोत्सवी समारंभ मंगळवारी सकाळी नऊ वाजता नेवासा येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब आहेत .या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांनी केले . प्रेरणा सहकारी पतसंस्थेचा खेळते भागभांडवल 125 कोटी रुपयांचे असून, वार्षिक उलाढाल 740 कोटी 50 लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे. संस्थेला सातत्याने अ आँडीट वर्ग असून संस्था सातत्याने नफ्यामध्ये आहे .संस्थेच्या संस्थेच्या मुख्य कार्यालय धरून सात शाखा आहेत. गुहा, तांभेरे, म्हैसगाव ,आंबी ,राहुरी, श्रीरामपूर, या सर्व शाखा संगणकीकृत असून कोर बँकिंग प्रणालीची सेवा सर्व ठिकाणी उपलब्ध आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तांभेरे सारख्या जिरायती भागात प्रेरणाने शाखा सुरू केली.गावाचा चेहरामोहरा प्रेरणाला जनतेने,सभासदांनी साथ दिली त्यामुळे बदलला आहे. जमीन सुधारणा, शेततळी,पाईपलाईन, सोने तारण,छोटे व मध्यम व्यावसायिक,बेरोजगार युवक यांचेसाठी प्रेरणा ने कर्जे दिली.त्यामुळे शेतीसह अनेक शेतीपूरक व्यवसायाला गती मिळाली. . गावाची पीक पध्दती बदलली.शेतीची उत्पादकता वाढली. शेतकऱ्यांच्या विकासात प्रेरणा पतसंस्था केंद्रस्थानी राहिली आहे. शैक्षणिक कर्जे दिल्याने उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे. दूध उत्पादनात मोठी वाढ झाली. संकरीत गायी,दूध डेअरी,मुक्त गोठे, तसेच पीक अप व टॅक्टर सारख्या वाहनांमूळे शेतीमाल वाहतूक व्यवसायाला बरकत आली.सभासदांच्या आर्थिक उत्पन्न वाढीस प्रेरणा पतसंस्था तांभेरे शाखा रोल माँडेल चे काम करीत आहे.शाखेतील ठेवी १६ कोटी पर्यंत पोहोचल्या आहेत तर यंदा कर्ज वितरण साडेसात कोटी रुपये झाले आहे. . नियमित कर्जफेड आणि बचतीची सवय अनेकांना लागली आहे. आर्थिक शिस्तीचे सभासदांना वैयक्तीक जीवनात लाभ मिळत आहेत.