राहुरी वेब प्रतिनिधी ,०६( शरद पाचारणे )-
पत्रकार हा समाजाचा चित्र रेखाटण्याचे काम प्रामाणिकपणे करत असतो, प्रशासनाच्या कामकाजात चुका झाल्यास त्या बदलण्याची संधी ही पत्रकाराच्या बातमीमुळे मिळते असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.
आज सहा जानेवारी रोजी सायंकाळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकारदिनानिमित्त सन्मान सोहळा पार पडला. प्रसंगी मुख्याधिकारी नवाळे बोलत होते.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी नवाळे व पत्रकार बांधवांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांचा मुख्याधिकारी नवाळे यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला.
पुढे बोलताना मुख्याधिकारी नवाळे म्हणाले की, मी गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून देवळाली प्रवरानगरपरिषदेचा मुख्याधिकारी महं कारभार बघत असून एक चांगल्या प्रकारचे कामकाज येथील पत्रकार बांधवांकडून सुरू असून नेहमीच सहकार्याची भावना व वस्तुनिष्ठ बातम्या हे ही येथील पत्रकारांची घ्यात खासियत आहे. देवळाली प्रवरा शहर विकासासंदर्भात पत्रकार बांधवांनी वेळोवेळी सूचना कराव्यात आम्ही निश्चित त्याचा आदर करु असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकारभवना संदर्भात प्रश्न उपस्थित झाला असताना त्या संदर्भात पाठपुरावा करू व पत्रकारांसाठी एक चांगली जागा उपलब्ध करून देण्याचा साठी प्रयत्नशील राहू असेही मुख्याधिकारी नवाळे म्हणाले.
यावेळीवयावेळी सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर, लेखा विभाग प्रमुख स्वप्निल फड ,बांधकाम विभाग बांधकाम विभागाचे दिनकर पवार अभिषेक सुतावणे, वसूली विभागाचे निखिल नवले , गोपाळ भोर , उदय इंगळे, नंदकुमार शिरसाठ आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केले.यावेळी मोठ्या संख्यने पत्रकार बांधव उपस्थित होते.