राहुरी वेब प्रतिनिधी,२९ (शरद पाचारणे )-
राहुरी पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर चार दिवसांपासून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या वाहन तपासणी दरम्यान चार दिवसांमध्ये राहुरी पोलिसांनी एकूण १७६ दुचाकी वर कारवाई करून 73 हजार 300 रुपयांचा दंड देखील वसूल करून शासन जमा केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली होती. चार दिवसात विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती या चार दिवसाच्या मोहिमेमध्ये एकूण १७६ बिना नंबर प्लेटच्या दुचाकी गाड्यांवर ७३३००रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. नऊ वाहन चालकांनी त्यांची कागदपत्रे सादर न केल्याने सदर संशयास्पद 9 वाहने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत .
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात केले की वाहन मालकांनी आपल्या दुचाकी ,चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणं सोप होईल. तसेच बऱ्याच नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम वाल्यांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल असे ठेंगे यांनी सांगितले .
सदर चोरीचे वाहन शोध मोहीम राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील , पोलीस हेड कॉन्स्टेबल गीते, ठोंबरे , पो. कॉ.सतीश कुराडे ,अंकुश भोसले ,नदीम शेख , जालिंदर धायगुडे, होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केलेली आहे.