लोणी वेब –
राजगुरुनगर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक शोषण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी अखिल भारतीय भटके विमुक्त जाती व जमाती गोसावी समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणी अनुक्रमे वय आठ व नऊ दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली असून सदरील कुटुंबीय हा भटके विमुक्त जाती व जमाती गोसावी समाजाचा असून सदरील कुटुंबीय पोट भरण्यासाठी परगावी मोल मजुरी करण्यासाठी गेलेले असून सदर त्या मुलींवर अत्याचार झालेला असून त्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी ही अखिल भारतीय भटके विमुक्त जाती व जमातीच्या गोसावी समाजाच्या वतीने विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
हे निवेदन शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्था महाराष्ट्र राज्यचे कार्यअध्यक्ष शामभाऊ गोसावी,गोसावी समाज जिल्हा उपाध्यक्ष संजुभाऊ गिरी , दाढचे विद्यमान सरपंच तात्यासाहेब सातपुते, दाढचे माजी सरपंच योगेश तांबे, भारतीय जनता पार्टीचे राहाता तालुका भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष अॅड मनोज लोखंडे , नितीन मुळेकर चंद्रापुर,अजित गवळी चंद्रापुर,अनिकेत मकवाणे,किशोर मुळेकर चंद्रापुर, विनोद गवळी चंद्रापुर,संजय मकवाणे यांच्या सह महिला भगिनी व इतर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.