राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे)-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आठवले गट) राहुरी तालुका अध्यक्ष विलासानाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी बस स्थानक परिसरात नगर-मनमाड रस्त्यावर रिपाइं कार्यालयासमोर “मनुस्मृती दहन” दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राहुरी तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,ज्या मनुस्मृतीने स्त्रिया,दलित,बहुजन समाजावर नको ते कायदे सांगितले होते,त्या मनुस्मृतीचे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तीन वेळा दहन केले होते,माणसा- माणसात भेद निर्माण करणाऱ्या व आमच्या माता-भगिनींवर अन्यायकारक नियम लादणाऱ्या मनुस्मृतीचे आम्ही दरवर्षीप्रमाणे नेहमी २५ डिसेंबरला दहन करून हा दिवस साजरा करणार आहोत,हा निर्धार सर्व बहुजन समाजाने व समस्त महिलांनी करावा,असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम शिंदे,सलमानभाई पठाण,युवा नेते सागरभाऊ साळवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य,मनुस्मृती,संविधान,मनुचे कायदे,आजची समाज व्यवस्था याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.मनुस्मृती दहनानंतर मोठ्या उत्साहात घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी रिपाइं तालुका उपाध्यक्ष सुनिल चांदणे,संतोष दाभाडे, बंटी हिवाळे,बाळासाहेब म्हस्के,नविन साळवे,राजू बागुल, रविंद्र शिरसाठ,मोहन पटेकर, संदिप साळवे,जॉन साळवे,आकाश मेहेत्रे, संदिप साळवे,राजू तांगडे, दिपक जाधव,प्रतिक रुपटक्के,रॉबर्ट सॅम्युअल आदी कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.