राहुरी वेब प्रतिनिधी,२५ (शरद पाचारणे )-
दिनांक 25/12/2024 रोजी गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की आज राहुरी शहरातील खाटीक गल्ली परिसरामध्ये गोवंश जातीचे मांस विक्री होत आहे तसेच काही गोवंशीय जनावरे बांधून ठेवलेली आहेत.सदर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांनी पोसई पाटील, पोहेकॉ सुरज गायकवाड, पोहेकॉ राहुल यादव, पॉको गणेश लिपणे, पॉको जयदीप बडे, पॉको जालिंदर धायगुडे यांना खात्री करण्यासाठी रवाना केले असता खाटीक गल्लीमध्ये कुठल्याही प्रकारचे गोमांस विक्रीसाठी आढळले नाही.परंतु त्या ठिकाणी पाच गोवंशिय वासरे बेवारस रित्या फिरताना आढळून आली त्यांच्या मालकीबाबत विचारपूस केली असता कुणीही उपयुक्त माहिती दिली नाही. त्यामुळे राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना कळवून त्यांनी स्वच्छता निरीक्षक राजेंद्र पवार, मुकादम सचिन वावरे, सफाई कामगार प्रसाद लाहुंडे,संतोष वावरे, सागर जगधने, सोमनाथ गायकवाड, निखिलेश वाघ यांना सदर ठिकाणी पाठवून गोवंशिय वासरे हे एका वाहनांमध्ये आणून त्याबाबत सविस्तर कारवाई करून सदर गोवंशिय वासरे गोशाळा येथे रवाना करण्यात आली आहे.सदर जनावरे कोणी आणि कशासाठी आणली होती याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांचे मार्गदर्शना खाली तपास पथक करत आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोसई पाटील, पोहेकॉ सुरज गायकवाड, पोहेकॉ राहुल यादव ,पॉको गणेश लिपणे, पॉको जयदीप बडे ,पॉको जालिंदर धायगुडे व राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे , स्वच्छता निरीक्षक राजेंद्र पवार, मुकादम सचिन वावरे, सफाई कामगार प्रसाद लाहुंडे,संतोष वावरे, सागर जगधने, सोमनाथ गायकवाड, निखिलेश वाघ यांचे पथकाने केली आहे.