देवळाली प्रवरा वेब टीम –
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळ येथे श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीय यांच्यावतीने आयोजित श्री साई चरित्र पारायण व भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याचा मंडप कामाचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी पार पडला.
देवळाली प्रवरा बाजारतळ येथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साई पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.यंदाचे ११ वे वर्ष असून २ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत पारायण सोहळा व राज्यातील नामांकित किर्तनकारांची कीर्तन सेवा , हरिपाठ, दररोज हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांच्यावतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून भव्य दिव्य मंडप देवळाली प्रवरा बाजार तळावर उभारण्यात येत असून या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून आज करण्यात आला. यावेळी श्री साई प्रतिष्ठानचे सदस्य व शहरवासीय उपस्थित होते.