अहिल्यानगर वेब टीम – पुणे येथील महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघ मर्यादित या संस्थेच्या राज्य पातळीवरील निमंत्रित संचालक पदी अहिल्यानगर जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी संचालक जयंत वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघाचे अध्यक्ष संजीव कुसळकर यांच्या सहीने त्यांना नुकतेच हे पत्र प्रदान करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा मजूर संस्थांचा संघ यांच्या वतीने राज्य पातळीवर जयंत वाघ यांच्या नावाला या पदावर नियुक्तीसाठी प्राधान्य देण्यात आले होते. त्यांच्या निर्देशानुसार राज्य संघाने त्यांची या पदावर नियुक्ती केली. जयंत वाघ हे राजकीय ,सामाजिक,शैक्षणिक, मजूर आणि कामगार क्षेत्रात विविध संस्थांच्या पदांवर सक्रिय आहेत.
अहिल्यानगर जिल्हा मजूर फेडरेशनचे तीन वेळा संचालक ते राहिलेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील मजूर सहकारी चळवळीतील अनुभवी कार्यकर्ते आणि नेतृत्व म्हणून त्यांची निवड या पदावर करण्यात आली. जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांच्या कामकाजातील अडचणी सोडवण्यासाठी आणि कामकाजातील माहिती राज्य फेडरेशनला व्हावी यासाठी राज्य सहकारी मजूर संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी त्यांना विशेष निमंत्रित यापुढे करण्यात येणार आहे. जिल्हा मजूर सहकारी संघाचे माजी संचालक जयंत वाघ यांची महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाचे फेडरेशन च्या निमंत्रित संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल संघाचे चेअरमन अर्जुनराव बोरुडे , व हॉईस चेअरमन विकिशेठ जगताप, ज्येष्ठ संचालक अनीलराव (मामा) पाचपुते , व्यवस्थापक प्रकाश कराळे तसेच सर्व संचालक मंडळ, सभासद संस्था, कर्मचारी वृंद यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले .