राहुरी वेब प्रतिनिधी,१८ (शरद पाचारणे )-
दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी पोलीस पाटील दिनाच्या अनुषंगाने राहुरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . मागील पार पडलेल्या लोकसभा निवडणूक 2024 व विधानसभा निवडणूक 2024 मध्ये चांगल्या प्रकारे काम केले तसेच वेळोवेळी पोलिसांना तपास कामात चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत.सर्व पोलीस पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच राहुरी तालुक्यातील श्री दादासाहेब भगवान पवार राहणार खुडसरगाव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने मानद डॉक्टर पदवी देण्यात आली आहे. त्यांचाही सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाकरिता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,श्रीमती संध्या दळवी निवासी नायब तहसीलदार ,सपोनि अमोल पवार ,पोसई समाधान पडोळ ,पोहेका अशोक शिंदे पोका आदिनाथ पाखरे पोका दादासाहेब रोहकले , नदीम शेख ,पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील, बबनराव अहिरे, सदाशिव तागड, सारंगधर शिंदे नंदकुमार खपके, लक्ष्मण जाधव, दादासाहेब पवार,सौ सुवर्णा पवार, सौ.सुनिता चेंडवण, सौ.भाग्यश्री बर्डे, सौ. हिराबाई नरोडे आदींसह सर्व पोलीस पाटील कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राहुरी खुर्द पोलीस पाटील बबनराव अहिरे व शिलेगावचे पोलीस पाटील सदाशिव तागड यांनी विशेष परिश्रम घेतले.