श्रीरामपूर वेब टीम – भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पंधराव्या स्वाभिमानी धम्मपरिषदेनिमित्त मला धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘स्वाभिमानी धम्मरत्न’ पुरस्कार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते देऊन राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ.आंबेडकर यांनी 1939 रोजी बारा बलुतेदार जुडी वतन परिषद श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव या ठिकाणी घेतली होती. याच घटनेच्या औचित्याने गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हरेगाव येथे स्वाभिमानी धम्म परिषद आयोजित केली जाते. दि 16 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य असे धम्मपरिषद या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना स्वाभिमानी धम्मरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राहुरी तालुक्यामध्ये 24 वर्षापासून सामाजिक क्षेत्रासह धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे यांना संस्थेच्या वतीने राहुरी तालुक्यातून धम्मरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, सत्यशोधक लहुजी सेनेसह सामाजिक संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.