राजनुर वस्तीगृहातील गरीब विध्यार्थ्यांना जाधव व शेख यांच्या कडून स्वेटर व उबदार कपड्याचे वाटप

राहुरी वेब प्रतिनिधी,०२ ( सुहास जाधव ) –

राहुरी शहरातील मिशन कंपाउंड येथील राजनुर वस्तीगृहातील गरीब विध्यार्थ्यांना सध्याच्या कडाक्याच्या थंडी पासून बचाव होण्यासाठी स्वेटर, पायमोजे आणि कानटोपी चे वाटप राहुरी खुर्द येथील भाऊ हरी जाधव (अंकल) आणि देवळाली प्रवरा येथील शहाबाद शेख यांनी केले .
सध्या कमालीची थंडी वाढली असून राहुरी शहरात असलेल्या राजनुर वस्तीगृहातील गरीब व अनाथ विध्यार्थ्यांना सकाळी शाळेत जाण्यासाठी व रात्री च्या कड्याक्याच्या थंडीला सामोरे जावे लागत होते. विध्यार्थ्यांना थंडीचे गरम कपडे किंवा अंगावर पांघरून घेण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत आश्या विध्यार्थ्यांना थोडी फार मदत करावी या विचाराने पत्रकार सुहास जाधव यांचे वडील राहुरी खुर्द येथील भाऊ हरी जाधव (अंकल) व देवळाली प्रवरा येथील शहाबाद शेख यांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी या लहान चिमुकल्यांची थंडी पासून बचाव होण्यासाठी उबदार स्वेटर, पायमोजे आणि कानटोपी आणून त्याचे वाटप केले , यावेळी भाऊ हरी जाधव (अंकल) आणि देवळाली प्रवरा येथील शहाबाद शेख तसेच गोपीनाथ भालेराव तसेच पास्टर सतीश नंनवरे यांच्या हस्ते श्वेटर, पायमोजे आणि कानटोपी तसेच खाऊ चे वाटप करण्यात आले . राहुरी शहरातील मिशन कंपाउंड येथे असलेले विध्यार्थ्यांचे राजनुर वस्ती गृहातील शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या गरीब,अनाथ चिमुकल्याना उबदार कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते . यावेळी वस्तीगृहाचे अनिल शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानले आणि जर कोणत्याही दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना जर राहुरी येथील राजनुर वस्तीगृहातील गरीब विध्यार्थ्यांना मदत करायची असेल तर रोहिणी स्याकमन 9371721989,अनिल शिरसाठ 8055101030 यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.

हरिभाऊ जाधव अंकल व शहाबाद शेख यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *