राहुरीत पोलिसांकडून विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई

राहुरी वेब प्रतिनिधी,१ (शरद पाचारणे ) –
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 1.12. 2024 रोजी विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. सदर मोहिमेदरम्यान 30 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. सदर वाहनांवर 20500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे
आजच्या कारवाईतील 30 दुचाकी वाहनांपैकी 24 वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे .उर्वरित वाहनां ची कागदपत्रे अद्याप पर्यंत नागरिकांनी हजर न केल्याने ती वाहने पोलीस स्टेशन येथे जमा आहेत.

राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोध ही सोपा होईल.
सदर चोरीचे वाहन शोध मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक , अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील , हनुमंत आव्हाड, संदीप ठाणगे, संजय राठोड, , बबन राठोड, बापू फुलमाळी, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुराडे, ,जालिंदर धायगुडे, यांच्या पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *