राहुरी वेब प्रतिनिधी,३० (शरद पाचारणे )-
राहुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळत झाला असून या कुत्र्यांच्या आक्रमकपणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला ,शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरून चालणे धाडसाचे ठरत आहे . या कुत्र्यांच्या वाढत्या प्रमाणावर तातडीने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राहुरी नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे पाटील यांनी केली आहे. राहुरी शहराच्या गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या धुमाकूळ घालत आहे या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतला असून रस्त्यावर किंवा भरपेठेत कुत्र्यांमध्ये झुंज झाल्यामुळे दुचाकी स्वार तसेच महिलांना अचानक अडथळे आल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. काही कुत्र्यांमध्ये पिसाळलेल्या असल्याची लक्षणे दिसत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका संभवू शकतो . राहुरी शहरात आहे या परिस्थितीवर त्वरित उपाययोजना आवश्यक आहे शिवाजीराव सोनवणे यांनी नगरपरिषदेवर उपस्थित केलेल्या या मागणीला शहरातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे त्यांनी नगर परिषदेच्या प्रशासनाला त्वरित पावले उचलून राहुरी शहरातील नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुसह्य वातावरण निर्माण करण्याची मागणी केली आहे.