राहुरी वेब प्रतिनिधी,२९ (शरद पाचारणे ) –
श्रीबुवासिंदबाबा मंदिराच्या आवारात दफनविधी होऊ नये अश्या मागणीचे निवेदन राहुरी येथील श्रीबुवासिंदबाबा मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले .
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्रीबुवासिंदबाबा मंदिर परिसरात राहात असलेले सर्व नागरिक यांनी श्रीबुवासिंदबाबा मंदिरात रोज श्रद्धेने दर्शनासाठी जातो श्रीबुवासिंदबाबा मंदिर परिसरात मोकळी जागा आहे सदर जागेमध्ये फार पूर्वी इनामदार यांच्या कबरी आहेत अशातच मंगळवार दिनांक 26 /11/ 2024 रोजी दुपारच्या सुमारास इनामदारांनी तेथे पुन्हा दफनविधी केला आहे मात्र सदरच्या दफन विधी बाबत व येथून पुढे होणारे दफन विधी बाबत आम्ही आक्षेप घेत आहोत कारण सध्या परिस्थिती वेगळी झाली आहे, लोकसंख्या वाढ रहिवासी यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ती जागा दफन विधीसाठी योग्य नाही तसेच सदरची जागा खूप छोटी आहे .
त्याचप्रमाणे तेथे दर्शनासाठी येणारे भाविकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे तसेच परिसरातील लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून सदर दफनविधी हा कब्रस्तान येथेच व्हावा तो लोकवस्तीत अथवा मंदिर परिसरात होऊ नये हीच सर्व रहिवाशांची नागरिकांची भूमिका आहे.
येथून पुढे श्रीबुवासिंदबाबा मंदिर परिसरात कुठलेही प्रकारचा दफनविधी होऊ नये प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व पुढील पंधरा दिवसात ठोस पावले उचलवी अन्यथा या गोष्टीमुळे सामाजिक तेढ वाद उद्भवण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. सदर निवेदनाच्या प्रती राहुरी तहसीलदार पोलीस निरीक्षक ,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व जिल्हाधिकारी अहिल्यानगर ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांना देण्यात आलेले आहे .