राहुरी वेब प्रतिनिधी दि,१३( शरद पाचारणे )-
आदर्श नागरी पतसंस्थेने सभासद व कर्मचारी यांना नेहमीच न्याय देऊन समाजातील सर्व सामान्य जनतेला आर्थिक आधार देऊन पुण्याचे काम केले आहे. आपल्या कृतीतून परोपकार नेहमीच संस्थेने जोपासला असल्याचे प्रतिपादन संत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ११ टक्के लाभांश वाटप व बोनस वाटप विजयादशमीच्या दिवशी दुपारी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उद्धव महाराज मंडलिक बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक व विद्यमान संचालक आण्णासाहेब चोथे, चेअरमन प्राध्यापक सुधाकर कदम, व्हॉईस चेअरमन आबासाहेब वाळुंज आदी उपस्थित होते.
प्रास्तविकात चेअरमन प्रा. सुधाकर कदम यांनी संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली.
महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते विजयकुमार खळेकर, यशवंत होले, सतीश हारगुडे, आसाराम राऊत आदिंसह सभासदांना लाभांश तर ५ शाखेतील कर्मचाऱ्यांना बोनस वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास बाबा महाराज मोरे,तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र तांबे , विजय डौले, मारुती हारदे, किशोर थोरात, प्रकाश सोनी, दत्तात्रय रोडे, मारुती खरात, विठ्ठल शेटे, भारत शेटे, सुजाता कदम, भारत काळे, बाळासाहेब ढोकणे, सँस्थेचे ज्ञानेश्वर सोनवणे, दत्तात्रय मोरे, संभाजी हारगुडे, संभाजी सौदागर, किरण सोनवणे, किशोर पवार आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.